जळगाव: जळगावमध्ये घरासमोर खेळत असताना शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे (Accident News). त्याच्यावर गेल्या दहा दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमध्ये पडून गंभीररित्या भाजल्या गेलेल्या देवांशू सुनील सोनवणे या 8 महिन्यांच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Accident News). आहे. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे घडली आहे. आठ महिन्यांपूर्वी त्यांना देवांशू हा 11 जानेवारी रोजी रात्री घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ वॉकरमध्ये खेळत-खेळत गेला व त्याचा तोल जाऊन थेट पेटत्या शेकोटीत पडला. (Accident News).


या घटनेमध्ये, त्याच्या चेहऱ्यापासून ते पोटापर्यंतचा भाग गंभीररित्या भाजला गेला होता. 11 जानेवारी रोजी गंभीररीत्या भाजल्या गेलेल्या देवांशूवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर 20 जानेवारी रोजी या बालकाचा उपचार सुरू असताना रूग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने संपूर्ण नांदरां खुर्द गावात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नांद्रा खुर्द येथे घरासमोर खेळत असताना बाजुलाच पेटलेल्या शेकोटीत पडून हा 8 महिन्याचा चिमुकला गंभीर भाजला गेला. या चिमुकल्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना (सोमवारी दि. 20) जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेमुळे नांद्रा गावात शोककळा पसरली आहे. या चिमुकल्याची गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.


देवांशु सुनिल सोनवणे (वय 8 महिने,  रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे आपल्या कुटूंबासह राहतात. दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात केले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी 20 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.