पुणे : आठ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिमुरडीच्या आजीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.
ऑगस्ट 2017 पासून हा अत्याचार सुरु असून या प्रकरणात 6 ते 12 या वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर 18 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यामध्ये 6, 10 आणि 12 वर्ष वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती अटकेत असलेल्या 18 वर्षीय आरोपीने दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
पुण्यात 8 वर्षांच्या चिमुकलीवर गँगरेप, अल्पवयीन मुलं ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2017 08:01 AM (IST)
चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -