पुणे : बाळचोरीच्या घटना ताज्या असतानाच आता एका आईची हत्या करुन तिच्या 25 दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातल्या हडपसर परिसरात उघड झाली आहे.
या प्रकरणी तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळ आणि आरोपी महिला सध्या हडपसर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पुण्यात मुलं पळवणाऱ्या टोळींनी गेल्या अनेक दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. मात्र आता एका आईची हत्या करुन तिचं बाळ पळवण्यापर्यंत या टोळीची मजल गेल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.