पुणे : मुन्नाभाई चित्रपटात धडधाकट माणसांनाही रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र रिल लाईफमधला हा प्रकार पुण्यात रियल लाईफमध्ये घडला आहे. पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात एकाच वेळी 200 बोगस रुग्ण आढळून आले.
पुण्यातीस डी वाय पाटील कॉलेजमधील निरोगी कामगारांनाच बोगस रुग्ण बनवून रुग्णालयात झोपवण्यात आल्याचं उघड झालं आहे. मात्र ही सगळी बनवाबनवी नेमकी कशासाठी हे समोर आलेलं नाही.
विशेष म्हणजे रुग्णांची प्रत्यक्षातील नावं, पत्ते आणि केसपेपरवरील माहिती वेगळीच आहे. धक्कादायक म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा कानावर हात ठेवले आहेत.
उलट, डीवाय पाटील डेंटल कॉलेजनंच हॉस्पिटलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप अधिकारी करत आहेत. डेंटल कॉलेजला हे रुग्णालय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या अटी पूर्ण न करताच पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप अधिकारी करत आहेत.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे पालिका रुग्णालयात रुग्णांऐवजी 200 कर्मचारी झोपवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2017 08:39 PM (IST)
पुण्यातीस डी वाय पाटील कॉलेजमधील निरोगी कामगारांनाच बोगस रुग्ण बनवून रुग्णालयात झोपवण्यात आल्याचं उघड झालं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -