अरुणा मनोहर सकपाळ असं महिलेचे नाव असून 43 वर्षीय मुलगा आनंद सकपाळविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडवणा भागातील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना गुरुवारी पहाटे तीन ते सहा वाजताच्या दरम्यान घडली.
पुण्यात पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या
आनंद आपल्या आईला सतत मारहाण करत असल्याचीही माहिती आहे. हत्येच्या दिवशीही त्याने आईला जबर मारहाण केली, त्यातच तिचा मृत्यू झाला. आई उठत नसल्यामुळे स्वतः आनंदनेच पोलिसांना कळवलं.
दवाखान्यात दाखल केल्यावर आईच्या अंगावर कुठलीही जखम नव्हती. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या छातीवर जखमा आढळल्या. पोलिसांनी तपास केला असता आई-मुलामध्ये सतत भांडणं होत असल्याचं शेजाऱ्यांकडून समजलं.
त्यानंतर मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.
दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील शनिवार पेठेत पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. 30 वर्षीय पराग क्षीरसागरने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला.