मुंबई: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे. यासंबंधी त्यांनी पुणे सायबर पोलिसात तक्रार नोंद केली आहे. प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाउंट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवरुन त्याची माहितीही दिली होती. आता या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.
सायबर चोरट्यांनी प्रवीण तरडे यांचे बनावट पेज तयार करून त्यावरून अनेक जणांना फोन आणि मेसेज केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना मेसेज देखील करण्यात आले होते. प्रवीण तरडे यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी आता प्रवीण तरडे यांनी पुण्यातील सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
काय म्हटलंय प्रवीण तरडे यांनी?
प्रवीण तरडे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन यासंबंधी पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, "नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. तिथून अनेक जणांना खोट्या लिंक्स, फोन नंबरची मागणी इत्यादी मेसेज केले जात आहेत. कोणीही त्याला रिप्लाय देऊ नये."
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर ते म्हणतात की, "इन्स्टाग्राम चालू आहे, फेसबुक हॅक झालंय .. कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका .. माझं इन्स्टाग्राम फेसबुक लिंक असल्यामुळे हा मेसेजसुध्दा फेसबुकला दिसू शकतो .. तसदी बद्दल क्षमस्व."
महत्त्वाच्या बातम्या :