Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari:  मुंबईतील (Mumbai) मील्स या राजस्थानी लोकांकडे होत्या. संपानंतर राजस्थानी लोक निघून गेले पण मुंबईवर परिणाम झाला नाही. मुंबईतील गुजराती समाज हा दाणाबाजार आणि दलालीमधे आहे.  हा समाज गेल्यावरही मुंबईवर परिणाम होणार नाही. कारण आज मुंबई मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर ट्रेडिंग हब आहे. हे ट्रेडिंग हब कुठला एक समाज चालवत नाही तर एम बी ए केलेला तरुण चालवतो. हा गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला (Maharashtra)  फरक पडणार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या(Bhagat Singh Koshyari controversial statement) वक्तव्यावर केली आहे.


 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत.  गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं होतं. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. 


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत पण देवेंद्र फडणवीस फक्त मंत्री ठरतात. घटनेप्रमाणे जोपर्यंत 12 मंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत कॅबिनेट होत नाही. त्यामुळे या दोघांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त आहेत, असंही ते म्हणाले या दोघांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणी कोर्टात गेले तर कोर्ट यांच्या निर्णयांना स्थगिती देऊ शकते.वंचित बहुजन आघाडी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा लढविणार आहे. आम्ही निवडणुकांत कॉंग्रेस बरोबर युती करण्यास तयार आहोत. आम्ही कॉंग्रेसला तशी ऑफर दिली आहे, असंही ते म्हणाले.


16 आमदारांना अपात्र ठरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत टाळाटाळ केलीय. शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या कारवाईवरील स्थगिती उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आता टाळाटाळ करणार नाही ही अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर हे सरकार राहिल की जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.