पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांवर आरोप प्रत्यारोप  Kalyani Nagar Pune Accidentकरण्यात आले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या तापासाला चांगलाच वेग आल्याचं दिसत आहे. विशाल अग्रवाल यांचे व़डिल सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस आयुक्तालायात बोलवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरलादेखील बोलवण्यात आलं. या प्रकरणातील एक एक पुरावा पुणे पोलीस शोधून काढत आहेत. त्यातच आता पुणे पोलीस थेट 'पोर्शे'तील चित्रीकरणही तपासणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. हे पोर्शेतील चित्रिकरण (व्हिडीओ) या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 


कल्याणी नगर येथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास भरधाव पोर्शे कारने दोघांना उडविले होते. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पब, घटनास्थळ आणि येरवडा पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.  अल्पवयीन मुलाने मद्यपान केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आता पोलिस आलिशान पोर्शे कारमधील कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासणार आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. 


विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवाल, बार कर्मचारी सगळ्यांची उद्या पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. यातून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. कल्याणी नगर अपघाताप्रकरणी आता पुणे पोलिसांचे देखील होणार चौकशी असल्याची माहिती आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांमार्फत नेमण्यात आलेल्या पोलिसांची समिती मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


आजोबा वडिलांच्या उत्तरात तफावत


अल्पवयीन आरोपी आणि कल्याणी नगर रॅश ड्रायव्हिंग केस प्रकरणात पोर्शे गाडीबद्दल काही प्रश्न होते. चौकशी दरम्यान दोघांच्या उत्तरांमध्ये काही प्रमाणात तफावत जाणवत होती. म्हणून आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांना समोरासमोर चौकशी साठी पुणे पोलिस आयुक्तालयात आणलं गेलं. अल्पवयीन मुलाची वागणूक, या घटनेआधी तो कसा वागायचा? एकूण त्याच्या लाईफस्टाईल बद्दल काही प्रश्न देखील या दोघांना विचारण्यात आले. 


इतर महत्वाची बातमी-


Kalyani Nagar Pune Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, आरोपीच्या वडिल-आजोबांच्या जबाबात तफावत, पालकांसह पोलिसांचीही चौकशी होणार


Pune Accident Case : 'बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल' विशाल अग्रवालच्या मुलाकडून मस्तीचे प्रदर्शन, रॅप साँगमुळे महाराष्ट्र संतापला