पुणे: पुण्याजवळील कोंढवा परिसरातल्या एका हुक्का शनिवारी सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 11 मुलींसह 68 जणांना ताब्यात घेतलं आहे.

 

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने कोंढव्यातील मॅश डोनाल्ड या हुक्का सेंटरवर छापा टाकला. यावेळी सेंटरचा मालक, 6 कामगार आणि काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्क्याची वेगवेगळी साधनं आणि काही रोकडही आपल्या ताब्यात घेतली.

 

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिथे 11 मुलीसह 42 तरुण होते. हुक्का सेंटरचा मालक, 6 कामगार, हुक्का पिणारे 11 मुली आणि 42 तरुण तिथे आढळून आले.