पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड इथे रविवारी रात्री टोळक्याकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. तर अनेक वाहनांची तोडफोड करुन नासधूसदेखील केली. यामध्ये अबूशेठ रोडवरील दुकांनांचं आणि वाहनांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं.

 

दुचाकींवरुन आलेल्या 40 ते 50 तरुणांनी यावेळी धुडगूस घातला. या टोळक्याने रात्री नऊच्या सुमारास दुकानांची आणि वाहनाची तोडफोड केली. तसंच तलवारी घेऊन दहशत माजवल्याचं कळतं

 

या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अबूशेठ रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.