पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटणे यांना तीन जणांनी मारहाण केली. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मिरवणूक सुरु असताना काल ही घटना घडली.
मिरवणुकीवेळी मागे हटण्यावरुन सुरु झालेल्या या वादात तीघाजणांकडून कॉन्स्टेबल पाटणे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटणे मागे लावलेल्या बॅरिकेट्सवर पडले. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल पाटणे यांना मारहाणप्रकरणी विनायक जांभूळकरला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघे आरोपी पळून गेले आहेत.