पुण्यात भाजप नगरसेवकावर गोळीबार, गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान घटना
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 15 Sep 2016 11:15 PM (IST)
पुणे : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. कँटोन्मेट बोर्डचे भाजप नगरसेवक विवेक यादव यांच्यावर दोघांनी गोळीबार केला. नगरसेवक विवेक यादव यांच्या तोंडाला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.