पुणे : विसर्जनासाठी मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास निघालेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन, आज सकाळी आठच्या सुमारास झालं. 


दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी मध्यरात्री सुमारे अडीचच्या सुमारास निघाला.  दरवर्षी दगडूशेठ गणपतीचं अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच्या सुमारास विसर्जन होतं. मात्र यंदा सुमारे तासभर उशीर झाला.



दगडूशेठ गणपतीच्या पुढे  सार्वजनिक मंडळांचे बाप्पांचे असल्याने मुख्य मिरवणुकीत सहभागी व्हायला वेळ लागला. सकाळी सातच्या सुमारास दगडूशेठ बाप्पा लक्ष्मीरोड चौकात दाखल झाला, तर साडेसातच्या सुमारास मिरवणूक अलका चौकात आली.

त्यापूर्वी कालच पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या गणपतीचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला होता.

ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली. पावसाच्या व्यत्ययाला न जुमानता, पुण्यात सकाळीच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली, ती आजही कायम आहे.