पुणे : पहिल्या लॉकडाऊनच्या सुरुवातीलाचं राज्य सरकारने घरमालकांनी तीन महिने भाडे आकारू नये, असं घरमालकांना आवाहन केलं आहे. मात्र, तरीही घरमालकांकडून घर भाडे वरुन केल्याचे प्रकार होत आहे. पुण्यातही असाच प्रकास उघडकीस आला आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यातील नवी पेठेत पेईंगगेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणीकडे घरभाड्यासाठी तगादा लावणाऱ्या घरमालकीणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रेया असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकिणीचे नाव आहे. याप्रकरणी मेघा या तरुणीने तक्रार दिली आहे.


लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचे काम गेल्याने ते बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे घरमालकांनी ही अडचण ओळखून तीन महिने घरभाडे आकारू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र, आवाहनाला घरमालक दाद देत नसल्याचे प्रकार घडत आहे. याच प्रकारात पुण्यात एक गुन्हा दाखल झालाय. मेघा या चंद्रपूर येथील रहिवासी असून त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी पुण्यात आल्या आहेत. नवी पेठेतील श्रेया यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहतात.


सोलापूरच्या उपमहापौरांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद


घरमालकीणी विरोधात गुन्हा दाखल
कोविड19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी जाहीर केलेला असून सदर कालावधीमध्ये घर मालक श्रेया यांनी ठरल्याप्रमाणे 1700 भाडे दे अन्यथा रूम खाली कर असे सांगून वारंवार धमकावत आहेत. अशी तक्रार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्याकडे आली होती. त्यानुसार या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर घर मालकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भादवि 188, 506(1), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा क. 51(ब), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा क. 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग मुंबई यांची सूचना प्रसिद्ध झालेली असून जगभर पसरलेल्या कोविड19 साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे कोणत्याही घरमालकाने भाडेकरूकडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये. तसेच किमान 3 महिने वसुली पुढे ढकलावी अशा लेखी सूचना दिल्या आहेत. असे असतानाही घरभाडयासाठी तगादा लावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.


Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट