पिंपरी चिंचवड : सोलापूरचा उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळे यांना ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळे यांना  कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले, मग काय पोलीस चक्रावले आणि काळेला नोटीस देऊन सोडण्यात आले. पण खरंच काळे यांना ताप आणि शिंका आल्या होत्या का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काळेंना शुक्रवारी सोलापूर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काळे यांनी पिंपरी चिंचवडमधील त्याचा एक फ्लॅट 7 ते 8 जणांना विक्री केलेला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना काळे यांनी हा बहाणा केल्याचं बोललं जातंय.
सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या काळे यांना काल रात्री पिंपरी चिंचवडमध्ये आणताच, त्याचं मेडिकल चेकअप झालं. तेव्हा काळेंना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मग आज सकाळपासून दाखल गुन्ह्यात काळेंची चौकशी सुरू झाली. तेव्हा मात्र काळे यांनी ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं आहेत, असं कारण पुढं करत काळे यांना शनिवारी पाच वाजता नोटीस बजावून सोडण्यात आले. पण काही तासांपूर्वी केलेल्या मेडिकल चेकअपमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटू लागली. वरिष्ठांच्या कानावर ही बाब पडताच. याप्रकरणाची तपासणी करणारे पोलीस उपनिरीक्षक आर एस पन्हाळेंची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.


केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर!

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या काळे यांना काल रात्री पिंपरी चिंचवडमध्ये आणताच, त्यांचं मेडिकल चेकअप झालं. तेव्हा काळें यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. मग दाखल गुन्ह्यात काळेंची चौकशी सुरू झाली. तेव्हा मात्र काळेंना ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं आहेत, असं कारण पुढं करत काळे यांना शनिवारी पाच वाजता नोटीस बजावून सोडण्यात आले. पण काही तासांपूर्वी केलेल्या मेडिकल चेकअपमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटू लागली. वरिष्ठांच्या कानावर ही बाब पडताच. याप्रकरणाची तपासणी करणारे पोलीस उपनिरीक्षक आर एस पन्हाळे यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.