पिंपरी-चिंचवड : पीएमपीएमएलच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने काल (मंगळवार) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम मुंडकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
काल दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच तुकाराम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
तुकाराम मुंडकर यांचं २ महिन्यापूर्वी पीएमपीएमलमधून निलंबन करण्यात आलं होतं. पण निलंबनामुळेच त्यांनी आत्महत्या केली असं ठोसपणे सांगता येणार नाही. असं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता याप्रकरणी भोसरी पोलीस वेगवेगळ्याने अंगाने तपास करत आहेत.
PMPMLच्या निलंबित कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2018 10:32 AM (IST)
पीएमपीएमएलच्या एका निलंबित कर्मचाऱ्याने काल (मंगळवार) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम मुंडकर असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -