पुणे : पीएमपीएलची बस पुलावरुन कोसळल्याची घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. कात्रजहून निगडी आणि वाकडकडे जाणाऱ्या बसला हा अपघात झाला.
वाकडकडे जाणारी बस वारजे-कात्रज बाह्यवळण मार्गावर उड्डाणपुलालगत ओढ्यात कोसळली. ओढ्यालगत उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर ही बस कोसळली.
बसमधील काही प्रवासी तसेच शेडकार्डमधील दोन नागरिकांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. स्थानिकाच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे.
पुण्यात बस पुलावरुन खाली कोसळली, 10 जण गंभीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2018 12:10 PM (IST)
या घटनेत दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. कात्रजहून निगडी आणि वाकडकडे जाणाऱ्या बसला हा अपघात झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -