पुणे: पुणे महापालिकेने पालिका हद्दीतील थकीत मिळकतकर वसुलीसाठी थकबाकी गोळा करण्यास सुरूवात केली आहे. काही लोक थकबाकी भरत आहेत. तर काहींनी अद्याप कोट्यावधीचा कर थकल्याने पालिकेने वसुली सुरू केली आहे. मात्र, पालिकेच्या मिळकतकर विभागाने सुमारे 47 कोटी 43 लाख रुपयांची थकबाकी न भरल्याने सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेच्या तीन मिळकतींचा ताबा घेतला आहे. 30 दिवसांत मिळकतकर न भरल्यास संबंधित मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती देखील प्रशासनाने दिली आहे.(PMC seals 26 properties of Sinhgad Technical Institute over 47 Crore 43 lakh property tax arrears)
महापालिकेच्या तिजोरीत चार दिवसांमध्ये 11 कोटी 19 लाख 11 हजार 612 रुपये थकबाकी जमा झाल्याची माहिती आहे. गुरुवारपर्यंत 23 मिळकती महानगर पालिकेने सील केल्या आहेत. आता मिळकत कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांची वसुली सुरू केली आहे.
सिंहगड इंस्टिट्यूटने पुणे महापालिकेचा 47 कोटी 43 लाख रुपयांचा मिळकतकर थकवला असून थकबाकीची रक्कम त्वरित भरावी असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. तरीही अनेक महिने न भरल्याने एरंडवणे भागातील संस्थेचे मुख्य कार्यालयासह 26 इमारती जप्त करण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत ही पूर्ण रक्कम न भरल्यास या इमारतींचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाईल अशा इशारा दिला आहे. मिळकतकर विभागाचे उपायुक्त यांनी ही माहिती दिली आहे. सिंहगड इंस्टिट्यूटची पुण्यात आंबेगाव बुद्रूक, कोंढवा बुद्रूक, एरंडवणे येथे महाविद्यालय, शाळा आहेत. या इमारतीचा मिळकत कर गेले पाच वर्षापासून भरण्यात आलेला नसल्याची माहिती आहे.
पुणे महापालिकेने ही थकबाकीची रक्कम भरावी यासाठी नोटीस बजावली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये महापालिकेने केलेली कारवाई योग्य आहे संस्थेने त्यांची थकबाकी भरावी असे आदेश दिले होते. तरीही गेल्या वर्षभरापासून संस्थेने थकबाकी भरली नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत गेला.अखेर महापालिकेने सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मुख्यालयासह 26 इमारतीची जप्ती करण्याची नोटीस बजावली आहे. सध्या केवळ इमारती जप्त केल्या असून त्यांना टाळे लावलेले नाही. त्यामुळे तेथील कार्यालय व शैक्षणिक कामकाज सुरु राहील. पण एका महिन्यात संस्थेने पैसे भरले नाहीत तर इमारतींबाबत पुढील कारवाई करावी लागेल, असेही जगताप यांनी सांगितले.
थकबाकी वसुली 14.14 कोटी
गेल्या पाच दिवसापासून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरु केल्यानंतर 165 मिळकतींसमोर बँड वाजवून 14vकोटी 14 लाख 26 हजार 212 रुपये इतकी थकबाकी वसूल करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्याआधी अर्थसंकल्पातील 2700 कोटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बँड वाजवून पैसे वसूल केले जात आहेत.