पुणे : शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता.

पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य होणं बाकी होतं. त्याआधीच प्रशासनाने या निर्णयावर स्थगिती आणली आहे.

सध्या अडीच हजार रुपयांमधे शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. मात्र वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं होतं.

31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला आणि काल महापालिकेने वृत्तपत्रांमधून तशी जाहिरात दिली होती.

संबंधित बातमी : शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी