पुणे : पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आठव्या 'भारतीय छात्र संसदचं' आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 'डेमोक्रसी ब्लॅक ऑर व्हाईट' या विषयावर परिसंवादात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उपस्थितांना पाहायला मिळाली.


लोकशाहीविषयी बोलताना, ''जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, उमर खालिद यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही. ते आपली लोकशाही खऱ्या अर्थाने समृद्ध करत आहेत'', असं तुषार गांधी यांनी सांगितलं. त्याचसोबत नेत्याने सदैव विनम्र असावं असंही ते म्हणाले.

तुषार गांधी यांच्या व्यक्तव्यामुळे चिडलेल्या स्मृती इराणी यांनी त्यांच्या भाषणाच्याच सुरुवातीला प्रत्युत्तर दिलं. ''मी भारत माता की जय गर्वाने म्हणते म्हणून मला अँटी नॅशनल म्हटलं गेलं होतं. आधी भाषण करणाऱ्या मुलांना तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट म्हटलं (त्यांनी सर्व मुद्दे सरकारच्या बाजूचे मांडले होते) ते त्यांनी विनम्रतेने स्वीकारलं. ही खरी लोकशाही आहे,'' असं स्मृती इराणी म्हणाल्या.