पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 13 तारखेला दुपारी पुण्यात आगमन केल्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.
नरेंद्र मोदी यांचं रविवारी दुपारी 4 वाजता पुणे विमानतळावर आगमन होईल. तिथून हेलिकॉप्टरने ते वसंतदादा शुगर इंस्टिट्युटकडे प्रस्थान करतील. दुपारी 4.30 च्या सुमारास मोदी 'वसंतदादा शुगर इंस्टिटयुट' मध्ये 'आंतरराष्ट्रीय शुगरकेन व्हॅल्युचेन व्हिजन 2025 शुगर' या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील.
संध्याकाळी 6 च्या सुमारास मोदी कार्यक्रम स्थळावरुन पुणे विमानतळाकडे प्रस्थान करतील. त्यानंतर संध्याकाळी 6.20 वाजता पंतप्रधान पुन्हा दिल्लीला रवाना होतील.