पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या चारही महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदी पुण्यात एकत्र सभा घेणार आहेत. शिरूर लोकसभेतील अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळरावांचा ही मोदी प्रचार करणार आहेत. त्यामुळंच आढळरावांच्या दृष्टीने आज ची ही सभा महत्वाची आहे. गेल्या लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आढळराव उत्सुक आहेत. यासाठी अजित पवार मोठी ताकद देताना दिसत आहे. याचाच भाग म्हणून आज थेट पंतप्रधान मोदींची सभा आढळरावांसाठी ही होत आहे. मोदी कोणत्या मुद्द्यावर बोलणार, हे त्यांनाच माहिती आहे. पण सभा जय्यत होणार आहे, असं आढळराव पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

नरेंद्र मोदींच्या सभेवेळी सगळेच उमेदवार मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. यावेळी आढळरावांनीदेखील मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. मात्र या सभेत मोदी शिरूर लोकसभेतील काही मुद्दे मांडणार की फक्त देश पातळीवरील मुद्द्यांचा उल्लेख करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सभेपूर्वी आढळराव पाटील म्हणाले की,  पुण्यातल्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींची आयोजित केलेली आहे त्यासाठी शहरी, ग्रामीण भागातील नागरिक उत्सुक आहेत. या सभेला मोठी गर्दी होणार आहे. शिरुर मतदार संघातील सगळ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्ते मोदींच्या सभेसाठी येणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साधारण 50 हजार लोक सभेला येणार असल्याचं आढळराव पाटील म्हणाले.

Continues below advertisement

स्थानिक मुद्द्यांवर मोदी बोलतील?

बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या चार लोकसभा मतदारसंघासाठी आज सभा आहे. या चारही लोकसभा मतदारसंघाचे वेगवेगळ्या समस्या आहेत. वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघातील प्रश्न जाणून आहे. त्यामुळे या प्रश्नांच्या मुद्द्यांवर प्रत्येक उमेदवार प्रचार करताना दिसत आहे. मात्र नरेंद्र मोदी या स्थानिक प्रश्नांवर बोलतील. या समस्या जाणून घेतील. त्यावर काहीतरी मुद्दे मांडतील की देशपातळीवरच्या मुद्यांवर बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  महायुतीकडून मोदींच्या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला सूचना देण्यात आल्या आहेत. सभा स्थळावर सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय वाहतूक आणि पार्किंगचीदेखील सोय करण्यात आली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

PM Modi in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे वाहतुकीत बदल, हे रस्ते राहणार बंद

PM Narendra Modi Pagadi : चांदीच्या कोयऱ्या अन् डायमंडचा सूर्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यात खास 'दिग्विजय योद्धा पगडी'