पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट इथं आयोजित 'शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन' या आंतराराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.
संध्याकाळी चार वाजता मोदींचं लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर मोदी कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होतील.
दुपारी 4.30 च्या सुमारास मोदी ‘वसंतदादा शुगर इंस्टिटयुट’ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय शुगरकेन व्हॅल्युचेन व्हिजन 2025 शुगर’ या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.