पिंपरी चिंचवड : भाजप आमदार राम कदमांच्या मुक्ताफळांचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. यावेळी अधिक चर्चा न करु देता, महापौरांनी तर अप्रत्यक्षपणे राम कदमांचे समर्थन केले.
सर्वसाधारणसभेत विरोधकांनी निषेधाचा ठराव मांडून, चर्चेची मागणी केली होती. मात्र महापौर राहुल जाधव यांनी त्या वक्तव्याची पक्षाने सीडी मागवली असून, ती पाहून पक्ष योग्य ती भूमिका मांडेल, असं म्हणत विषय पत्रिकेवर चर्चा सुरु करण्याचे आदेश दिले.
सभागृहातील महिला नागरसेविकांना राम कदमांच्या वक्तव्यांचा निषेध करायचा असताना. महापौरांनी घेतलेली भूमिका कदमांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करणारी होती. नंतर चूक झाल्याचं लक्षात येताच पुढे निषेध करणाऱ्याला मुभा देण्यात आली.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.
राम कदम यांचा माफीनामा
दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."
संबंधित बातम्या
राम कदम यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?
बेताल वक्तव्याप्रकरणी राम कदम यांचा माफीनामा
..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम
राम कदमांना 8 दिवसांत उत्तर देण्याचे महिला आयोगाचे आदेश
राम कदमांविरोधात आंदोलन, काँग्रेस महिलांचा आपापसातच वाद
धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, उद्धव यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी
"मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा"
प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!
पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल
राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू : अॅड. स्वाती नखाते पाटील