पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी हा पोलिसांसमोरील मोठा प्रश्न बनला आहे. पैसा, ड्रग्स, अनैतिक संबंध यातून गुन्हेगारी घडत असताना, आता पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास द्यायचा, त्यातून ही घटना घडल्याचं आत्तापर्यंतच्या प्राथमिक पोलीस (Police) तपासात समोर आलेलं आहे. आरोपी तरुणी आणि तरुण हे जिम ट्रेनर असून मयत तरुणाची जिममध्येचं त्यांच्याशी ओळख झाली होती. यश पाटोळे आणि प्रांजल तावरे अशी आरोपी जिम ट्रेनरची नावं असून या दोघांचं पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझल शॉप आहे. याचं शॉपमध्ये आज दुपारी गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे हा आला होता. त्यावेळी, त्याने प्रांजलला शिवीगाळ केली. वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैशांची मागणी, या त्रासाला प्रांजल कंटाळली होती. त्यातूनच ही हत्याकांडाची घटना घडली आहे. 

Continues below advertisement

जिम ट्र्रेनर असलेल्या प्रांजलसोबत आज दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा एकदा लल्ला वर्पे याच्याकडून त्रास देण्याचा तोच प्रकार घडला, त्यावेळी प्रांजलने गोपीनाथच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहारने मारहाण केली. यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेतील गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. मग प्रांजल आणि यश दिघी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले अन् घडला प्रकार पोलिसांना सांगितला. प्रांजल आणि यश ज्या जिमचे ट्रेनर आहेत, त्याच जिममध्ये गोपीनाथ जिमला येत होता. तिथंच यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली. मात्र, गोपीनाथ प्रांजलकडे पैशांची मागणी का करत होता? तो तिला शिवीगाळ करुन का त्रास देत होता? असा आरोप केला जता आहे. मात्र, हे अद्यापही अस्पष्ट आहे. आता, पोलीस तपासात प्रांजल आणि यशकडून या बाबी समोर येतील. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. 

हेही वाचा

मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जिवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले

Continues below advertisement