पिंपरी चिंचवड : हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी चोरी करण्याची वेळ एका इसमावर आली आहे. 54 वर्षीय अनिल गायकवाड असं त्यांचं नाव आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली.
दौंड येथील अनिल आणि त्यांची पत्नीवर हृदयाच्या आजारावर उपचार सुरु आहेत. अशा स्थितीत ते काही कामही करत नव्हते, त्यात घरची परिस्थिती हलाखीची. मुलगा पुण्यात मजुरी करतो, त्याच्या पगारात आई-वडिलांच्या उपचाराचा खर्च ही भागेना. अशातच अनिल 7 मार्चला पुण्याच्या रुबी रुग्णालयात तपासणीसाठी आले, तेव्हा पुढील शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख खर्च सांगण्यात आला.
रुग्णालयाच्या बाहेर येताच त्यांनी एक दुचाकी चोरली, तिथून ते पिंपरी चिंचवड इथल्या पाहुण्यांकडे आले. नंतर चिंचवड इथल्या ज्वेलर्स दुकानाबाहेर रेकी केली. एकाने दागिने आणि मोबाईल खरेदी करुन ज्युपिटरच्या डिक्कीत ठेवला. पुढे जाऊन मिठाई खरेदीसाठी गाडी पार्क केली, त्या दरम्यान अनिल यांनी कशाच्या तरी साहाय्याने डिक्की उघडली. दागिने आणि मोबाईल असा 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली. त्याआधारेच पिंपरी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यावेळी हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी चोरी केल्याचं समोर आलं. हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांच्याविरोधात 2010-11 मध्येही चोरी केल्याचा गुन्हा खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
पती-पत्नीला हृदयाचा आजार, शस्त्रक्रियेसाठी चोरी करण्याची वेळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Mar 2019 02:20 PM (IST)
हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांच्याविरोधात 2010-11 मध्येही चोरी केल्याचा गुन्हा खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -