पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाच पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक दृष्टिहीन व्यक्तीचा ही समावेश आहे. प्रशासनाने समस्या न सोडविता जाणीवपूर्वक त्रास दिला. असा आरोप करत दोघांनी हे पाऊल उचललं. ध्वजारोहण झाल्यावर पालिका आयुक्तांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली अन पालिकेतच एकच खळबळ उडाली.
पालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र दिन साजरा होत होता. आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण केलं, त्यानंतर पालिकेने आयोजित केलेले काही कार्यक्रम सुरू होते.
राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र गीत सुरू होते. त्याचवेळी अजय गायकवाड यांने काठीने आयुक्त सिंह यांच्या मोटारीची काच (Pimpri Attack on Commissioner Car ) फोडली.
काचा फोडण्याचे कारण...
पोलिसांनी तत्काळ गायकवाड यांना ताब्यात घेतले. चालकाने तत्काळ मोटार हलविली. ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. आयुक्त सिंह हे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसऱ्या मोटारीने रवाना झाले. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीनं या दोघांना शांत केलं. या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हे कारण शोधण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. माझ्या टपरीवर वारंवार कारवाई केली जातीये, ऊसाच्या रसाचे गुऱ्हाळ टाकण्यासाठी परवानगी दिली नाही, रमाबाई आवाज योजनेतील घरकुलास निधी दिला जात नाही, सोबतच पालिकेच्या रुग्णालयात उपचाराची तत्परता दाखवली जात नाही असे आरोप या दोघांचे होते.
प्रशासनाचा वेळकाढूपणा निराकरण करण्याची पद्धत पुन्हा एकदा चव्हाट्यावर
प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि समस्यांचं निराकरण करण्याची पद्धत यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आता या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून या दोघांना ही समज देऊन त्यांना घरी सोडून देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी मला मारहाण केल्याचा आरोप दोघांनी केली आहे. आज तर आम्ही गाडीची पुढची काच फोडली मागण्या मान्य झाल्या नाही तर गाडी जाळून टाकू, असा इशारा देखील त्या दोघांनी दिला आहे.
हे ही वाचा :
Pune Crime News: दादागिरी म्हणा किंवा मुजोरी! पुण्यात पेट्रोल भरण्यावरून दोघांनी केली तरुणाला मारहाण, Video Viral