पिंपरीतील 'त्या' खड्ड्यात काल उकळतं, आज थंडगार पाणी
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2017 08:33 PM (IST)
महापालिकेचे उद्यान अधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. खड्ड्याखालून गेलेली थ्री फेज वायर बाहेर काढण्यात आली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील 'त्या' खड्ड्यातून आज चक्क थंड पाणी बाहेर आलं. काल याच खड्ड्यातील उकळत्या पाण्यामुळे दहा सेकंदात प्लास्टिकची बाटलीही वितळली होती. थ्री फेज वायरच्या करंटमुळे उकळतं पाणी आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलं होतं. आश्चर्य आणि काही काळ भीती निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे शहरातच नव्हे, तर राज्यात खळबळ उडाली होती.