पुणे: पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलवरुन पुन्हा एकदा रण पेटलं आहे. पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल होणार की नाही? याचं उत्तर आज मिळणार आहे.
बावधन परिसरातील नागरिकांनी सनबर्नला विरोध केलाय, तसंच नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रतन लथ यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
थोड्याच वेळात सनबर्नच्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू खेमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.
आधी सनबर्न फेस्टिवल पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीमध्ये होणार होता. मात्र तिथल्या स्थानिकांनी विरोध केल्यानं ठिकाण बावधनला हलवण्यात आलं.
दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं.
देशातील आघाडीचे गायक आणि डीजे आर्टिस्ट यांच्या लाईव्ह परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये सनबर्नच मोठं आकर्षण आहे. मागील नऊ वर्षे सनबर्न गोव्यामध्ये आयोजित होत होता, त्यानंतर गेल्या वर्षी तो पुण्यातील केसनंद या गावात झाला होता.
सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?
सनबर्न हा पूर्णत: व्यावसायिक ईडीएम अर्थात इलेक्ट्रिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल आहे. ईडीएम यावरुनच हा फेस्टिव्हल कसा असेल, याचा अंदाज बांधता येईल.
डीजेचा ठोका, चकाकणारं लाईटिंग आणि बेधुंद तरुणाई असं थोडक्यात वर्णन या सनबर्न फेस्टिव्हलचं करता येईल.
हा आशियातील सर्वात मोठा, तर जगातील पहिल्या 10 फेस्टिव्हल्सपैकी एक म्युझिक फेस्टिव्हल असल्याचा दावा करण्यात येतो.
संबंधित बातम्या
निखिल चिनापा, सनबर्न फेस्टिव्हलचा निर्माता
सनबर्न फेस्टिव्हलचा इतिहास
'सनबर्न'मध्ये मापात पाप, पेगमध्ये कमी दारु भरल्याने गुन्हा
सनबर्नच्या आयोजकांनी मुंबई महापालिकेचे 10 लाख रुपये थकवले