पिंपरी-चिंचवड : सोन्याचं शस्त्र, सोन्याचं अस्त्र, सोन्याचीच गदा, सोन्याचा मूषक, अवघे बाप्पा सोन्याचे. पिंपरी-चिंचवडच्या रांका ज्वेलर्समधल्या या बाप्पांच्या दर्शनासाठी सध्या झुंबड उडाली आहे. पण हे बाप्पा इथं आलेत एका खास कारणामुळे.


 
लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली ही मूर्ती 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. तब्बल 400 ग्रॅम सोन्याने तयार झालेल्या या मूर्तीची किंमत 16 लाख 54 हजारच्या घरात आहे. गणेश चतुर्थीला हे बाप्पा भक्ताच्या घरी जातील. पण तोपर्यंत नखशिखांत सुवर्ण बाप्पा पिंपरीकरांना दर्शन देत आहेत.

 
सृष्टीच्या चराचरात देव आहे असं म्हणतात. पण तरीही भक्त देवाला मूर्तीत शोधतो. मग ती मूर्ती मातीची असो, चांदीची असो किंवा सोन्याची. पवित्र भक्ती महत्त्वाची.