पुणे : पुण्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या अंत्यविधीचा खर्च यापुढे पालिका प्रशासन उचलणार आहे. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
यापुढे पुण्यातील ज्या नागरिकाचा मृत्यू होईल, त्याच्या अंत्यविधीचा खर्च महानगरपालिका करणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे गरीब नागरिकांवर कठीण काळात येणारा खर्चाचा भार थोडासा हलका होण्यास हातभार लागणार आहे.
घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास, कुटुंबीयांना पैशांची तजवीज करण्यास अडचण होते. मात्र अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पाडण्याची सर्वसामान्य नागरिकांची भावना ओळखून पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.