मुलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू; उन्हामुळे डोकं, मांडीही भाजली
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2018 02:40 PM (IST)
पण गाडी अचानक लॉक झाली आणि तेव्हापासून तो पावणे सहा तास गाडीत अडकला होता.
NEXT PREV
पिंपरी चिंचवड : चाकणमध्ये गाडीत गुदमरुन आणि उन्हाचे चटके बसल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. करण पांडे असं मृत मुलाचं नाव आहे. सोमवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता ही घटना समोर आली. घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना, करण दुपारी बाराच्या सुमारास उन्हात उभी असलेल्या इस्टिम गाडीत बसला. पण गाडी अचानक लॉक झाली आणि तेव्हापासून तो पावणे सहा तास गाडीत अडकला होता. बजाज ऑटो कंपनीच्या मोकळया जागेत ही कार दोन महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत होती. भर दुपारचं ऊन आणि त्यात काचा बंद यामुळे तो गुदमरला. उन्हाचे चटके तर असे बसले की मांडी आणि डोक्याचे कातडीही जळाली. संध्याकाळी पावणे सहा वाजता वडिलांना त्याचा मृतदेह गाडीत आढळला.