पिंपरी चिंचवड : पत्नीने 200 रुपये मागितल्याच्या रागातून पतीने चार महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. दत्ता देशमुख असं या निर्दयी बापाचं नाव आहे.


पोटच्या मुलाच्या जीवाशी खेळणाऱ्या बापाला स्थानिकांनी चांगला चोप दिला आणि नंतर पिंपरी पोलिसांच्या हवाली केलं. गंभीर जखमी झालेल्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बौद्धनगरमध्ये राहणाऱ्या देशमुख दाम्पत्यामध्ये मंगळवारच्या रात्री भांडण सुरु झालं आणि त्यानंतर हा प्रकार घडला. देशमुखने आधी पोराच्या गळ्यावर ब्लेड धरलं आणि नंतर बाळाला जमिनीवरच आदळलं. त्यानंतर उपस्थितांनी बापाला चांगला चोप दिला.

यापूर्वीही देशमुखने दीड वर्षांच्या मुलाला पुलावरुन फेकलं होत, सुदैवाने चिमुकला यातून बचावला होता.