पुणे : पुण्यातील राजभवन या राज्यपालांच्या निवासस्थानाच्या बागेतील चंदनाच्या चार झाडांची चोरी झाली आहे. चोरट्यांनी रात्री झाडं कापून नेल्याची तक्रार राजभवनचे सुरक्षा अधिकारी दिनेश देशपांडे यांनी चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमधे दिली आहे.


या आधीही राजभवनच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. मात्र पुणे पोलिसांकडून राजभवनच्या सुरक्षेसाठी असलेल्या तीन पोलिस कॉन्स्टेबलची संख्या कमी करुन एक केली.

राजभवनमधील अधिकाऱ्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना याबाबत बारा वेळा विनंती करणारी पत्रे पाठवण्यात आली. मात्र पुणे पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

महत्त्वाचं म्हणजे राजभवनपासून अगदी हाकेच्या अंतरावर चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन आहे.