Pimpari Accident Case : मुंबई - बेंगलोर महामार्गावर पोर्षे कार अपघाताची पुनरावृत्ती झालीये. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी पोर्षे कार अपघातातून काही धडा घेतल्याचं दिसत नाही. कारण कोणी तक्रार दिली नाही, असं कारण पुढं करत हिंजवडी पोलिसांनी चालकाला सोडून दिलं आहे. मात्र आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या भीषण अपघाताची दृश्य समोर आणली आहेत. 


कारने महामार्गाच्या बाजूने निघालेल्या महिलेला उडवले


बेदरकारपणे चाललेल्या या कारने महामार्गाच्या बाजूने निघालेल्या महिलेला उडवले. कारचा वेग इतका होती की धडकेने ती बरेच फूट लांब फेकली गेली. त्यानंतर कार थेट एका दुकानात घुसली. या दृश्यातून महिलेला मोठी इजा पोहचली असेल असंच स्पष्टपणे दिसून येतंय. हिंजवडी पोलिसांच्या हद्दीतील भुजबळ चौकात हा अपघात झाला होता. मात्र महिलेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिली नाही, म्हणून पोलिसांनी कोणताच गुन्हा दाखल केला नाही. 


महिलेने आणि कुटुंबियांनी चालकाविरोधात कोणती ही तक्रार दिली नाही


महिलेला मोठी इजा पोहचली नाही, त्यामुळं महिलेने आणि कुटुंबियांनी चालकाविरोधात कोणती ही तक्रार दिली नाही. असं हिंजवडी पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु पोर्षे प्रकरणात पोलिसांवर प्रश्न उपस्थित झाले असताना, यातून धडा घेत स्वतः पोलिसांनी फिर्याद का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित झालाय.





इतर महत्वाच्या बातम्या 


पुणे पोर्शे केसमध्ये ब्लड सॅम्पल अफरातफरी करणारा मास्टरमाईंड कोण? पुणे पोलिस त्याला कसं शोधणार?