पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु असून दिवसेंदिवस नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता पोलिस या प्रकरणातील ब्लड सॅम्पलची अफरातफरी करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत. या प्रकरणात रक्ताचे नमुने नेमके कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून बदलले, याचा पोलिस शोध घेत आहेत. पुणे पोर्शे कार प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सोमवारी पार पडलेल्या या सुनावणीत न्यायालयाने विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार याना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ब्लड सॅम्पल अफरातफरी करणारा मास्टरमाईंड कोण?
रक्ताचे सॅम्पल फेरफार प्रकरणात मास्टर माईंड कोण याचा तपास आता पोलिस करत आहेत. यासाठी मोबाईल,सीसीटीव्ही या तांत्रिक बाबींचं विश्लेषण करण्यासाठी तपास महत्वाचं असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून न्यायालयासमोर करण्यात आला. याप्रकरणात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.
ब्लक सॅम्पलमध्ये फेरफार कुणाच्या सांगण्यावरून?
रक्ताचे सॅम्पल फेरफार करणारा अश्फाक मकानदार याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्फाक मकानदारला ब्लड सॅम्पल बदलण्यास कुणी सांगितलं? अश्फाक मकानदारने ब्लक सॅम्पलमध्ये फेरफार केली, मात्र त्याने हे कोणाच्या सांगण्यावरुन केलं. तो विशाल अग्रवालपर्यंत कसा पोहचला? या बाबींचा पोलिस शोध घेत आहेत.
पुणे पोलिस त्याला कसं शोधणार?
अश्फाकने कुणाच्या सांगण्यावरून हे केलं? अग्रवाल दाम्पत्याशी त्याची ओळख होती का? किंवा त्याला अशा कोणत्या व्यक्तीने अग्रवाल कुटुंबियांना मदत करायला सांगितली आणि मध्यरात्री अश्फाक मदतीला धावून गेला, याचा पोलिस शोध घेणार आहेत. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची चेन चेक करणार आहे. कोणाशी कोणी कसा संपर्क केला याची चौकशी करुन मास्टरमाईंडपर्यंत पोहचणार
महत्त्वाच्या इतर बातम्या :