मुंबई : एक्स्प्रेस वेनं मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील कुसगाव-खालापूरदरम्यान नवा लेन बांधण्यास हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे मुंबई-पुण्यादरम्यानच्या प्रवासाची वेळ अर्ध्या तासानं कमी होणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नवीन लेन बांधण्यासाठी महामंडळानं कुसगाव ते खालापूर दरम्यानच्या जमीन हस्तांतरणासाठीही सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरुन मुंबई-पुणे प्रवास अधिकच जलद होणार आहे.
या प्रकल्पासाठी 266 एकरची जागा आवश्यक आहे. त्यापैकी 106 एकर जागा ही स्थानिकांच्या मालकीची असून 160 एकर जागेवर जंगल आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील कुसगाव-खालापूरच्या नव्या लेनसाठी जंगलतोड करावी लागणार आहे. दरम्यान, या नव्या लेनसाठी 4 हजार 798 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.