PCMC Drugs : पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या (Drugs) मेफेड्रोन ड्रग्स (PCMC News) प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा ला अटक केली होती. अधीकच्या तपासात या ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलंय. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी 43 किलो एमडी ड्रग्स जप्त केल आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत पोलिसाकडूनच 42 असे एकूण 45 किलो एमडी ट्रक्स जप्त करण्यात आलं. या ड्रग्स ची किंमत तब्बल 45 कोटी इतकी आहे.


पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुरू असलेल्या ड्रग्स विक्रीला अजूनही आळा बसलेला नाही अशीच स्थिती समोर येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रोन आढळलं होतं.  ज्याची किंमत 2 करोड 38 लाख आहे. पिंपळे निलखमधल्या रक्षक चौकात अज्ञात व्यक्तीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली आणि नमामी शंकर झा अस अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. या ड्रग्स रॅकेट ची मोठी व्याप्ती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर करडी नजर ठेवली आहे. मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी मोठं ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. साधारण 4000 कोंटींचं ड्रग्स पुणे पोलिसांनी  पुणे, सांगली आणि दिल्लीतून जप्त केलं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी विविध भागात पेट्रोलिंग सुरु केलं आहे. पुण्यातील विविध परिसरात पोलीस लक्ष घातलं आहेत.


 ड्रग्स तस्करांवर नजर ठेवा; आयुक्तांचे आदेश


पुण्यात मोठं ड्रग्स रॅकेट पकडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ड्रग्स पकडण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही शहरातील पोलिसांनी ड्रग्स तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात माहिती मिळेल त्या  ठिकाणी अजून ड्रग्स विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Baramati Eknath Shinde : 'आमचं सरकार राजकारण विरहित'; सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असतांना मुख्यमंत्री थेटच बोलले