पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. वीज बिल न भरलेल्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम महावितरण विभागाने सुरू केली आहे. पुणे विभागात गेल्या 25 दिवसात तब्बल 29 हजार जणांचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांकडे 88 कोटी 45 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणाचा आर्थिक भार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवर असल्यामुळे आता विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे.

पुणे विभागाच्या महावितरण विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी आता वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्बल 88 कोटी 45 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवर असल्यामुळे आता विभागाने थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. परिमंडलातील विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात येतोय. कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर त्यांचे लाईट बिल असे आवाहन महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केलं आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून महावितरण विभागाने वीज बिल न भरलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये पुणे विभागातील शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांचा सुद्धा समावेश आहे. पुणे परिमंडलातील 29 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या 25 दिवसांत खंडित करण्यात आला आहे. महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार याबाबत बोलताना म्हणाले, संपूर्ण पुणे विभागात महावितरण विभागाची कारवाई सुरू आहे. यामध्ये शहरासह पिंपरी चिंचवड यासह ग्रामीण भागात सुद्धा कारवाई सुरू आहे. जे नागरिक त्यांच्या घराचे किंवा आस्थापनाचे वीज बिल भरत नाहीत त्यांचा वीज पुरवठा आमच्या कर्मचाऱ्यांकडून खंडित करण्यात येतोय. वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी विभागाची वेबसाइट व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन पवार यांनी केलं आहे. 

पुणे शहरातील वीजग्राहकांकडे 40 कोटी 9 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 24 दिवसांमध्ये 10 हजार 177 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे 18 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील 7 हजार 796 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरण विभागाकडून ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली याभागात सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.