Pune Crime News : पुण्यात (Pune) दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जवळच्या नातेवाईकांकडूनच सावत्र बहिणींवर दोन दिवस अत्याचार करण्यात आला आहे. घरात डांबून ठेवत या 2 अल्पवयीन आरोपींकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याबाबत 2 अल्पवयीन आरोपींवर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दोन्ही अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी एकूण 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. घरी बोलवत आणि फुस लावत नातेवाईक असलेल्या 2 अल्पवयीन मुलांकडून दोन दिवस लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात सध्या चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या: