पुणे : विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शाळांनी पालकांना फी संदर्भात स्पष्ट माहिती द्यावी, असे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. आज पुन्हा एकदा फी वाढीच्या मुद्यावरुन तावडेंनी संतप्त पालकांनी घेराव घातला.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय विज्ञान संमेलनात तावडे आले होते. त्यावेळी पालकांनी त्यांना घेराव घातला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकांमध्ये फी वाढीसंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी शाळांच्या फी वाढीविरोधातील संताप योग्य असल्याचं मान्य केलं.
अवाढव्य फी वाढवणाऱ्या 7 शाळांची सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होते आहे. यात न्यायालय काय आदेश देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज्यातील शाळांमध्ये बेकायदेशीरपणे होणाऱ्या फी वाढीविरोधात परवाही पुण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडेंना घेराव घालण्यात आला होता. पुण्यातील पालक संघटनांनी विनोद तावडेंना घेराव घातला. त्यावेळी फी वाढीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली. या विषयाबाबत पुन्हा सुनावणी घेऊ, असं आश्वासन देऊन विनोद तावडे निघून गेले होते.