पुणे:  संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर (Zubair Hungergekar) याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचे नंबर आढळल्याची माहिती समोर आली आहे.  जुबेर हंगरगेकरच्या (Zubair Hungergekar) मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ५ आंतरराष्ट्रीय क्रमांक आढळून आले आहेत. हंगरगेकर याच्या जुन्या आणि वापरत्या हँडसेटमध्ये आखाती देशातील नंबर आढळून आले आहेत. जुन्या हँडसेटमध्ये १ नंबर पाकिस्तान, २ नंबर सौदी अरेबिया, १ नंबर ओमान आणि १ नंबर कुवेतचा आहे.वापरत असलेल्या मोबाईलमध्ये १ ओमान आणि ४ सौदी अरेबियाचे नंबर सेव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे.(Zubair Hungergekar) 

Continues below advertisement

या नंबर बाबत चौकशी केली असता माहीत नसल्याचं हंगरगेकरने चौकशीवेळी केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं आहे. संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकरला अटक करण्यात आली होती.

हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, सध्या कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तसेच त्याचे कुटुंब कोंढवा परिसरात राहते. दरम्यान, एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी काही संबंध होता का, त्याच्याकडे हे साहित्य का आणि कोणत्या उद्देशाने होते, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून त्याच्या मित्राचीही चौकशी केली जाणार असून, त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जाईल. तसेच तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का, हेही तपासले जात आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय क्रमांक झुबेर हंगरगेकर याच्यासाठी महत्त्वाचे असून यातून त्याचं दहशतवादी कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, या नंबरबाबत चौकशी केली असता, ते कोणाचे आहेत किंवा त्यांचा कशाशी संबंध आहे, याबद्दल माहिती नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर हंगरगेकरने दिले आहेत.

Continues below advertisement

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हंगरगेकरचा अल-कायदाच्या सदस्यांशी संपर्क होता का आणि त्या संपर्काचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडे अल-कायदाचे साहित्य का आणि कशासाठी ठेवले होते, हेही आम्ही तपासत आहोत. त्याच्या ताब्यात असलेल्या मित्राची चौकशी केली जाणार असून, त्याचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणीही केली जाईल. तो इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.” दरम्यान, एटीएसने या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील विविध भागांत सर्च ऑपरेशन राबवले होते. ही कारवाई एका जुन्या आयसिस मॉड्यूलच्या तपासाशी संबंधित होती. त्यावेळी संशयित कट्टरपंथी व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान १९ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. या छाप्यांदरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली होती.