Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवडमधील मतदारांना पन्नास टक्क्यांत गृहउपयोगी वस्तूंचं प्रलोभन दाखवलं गेलंय. महागाईच्या जमान्यात मतदारांना हे आमिष दाखवून मतं मिळविण्याचा यामागचा हेतू आहे. आगामी महापालिका निवडणुकीत (pimpri chinchwad mahanagarpalika) प्रभाग क्रमांक 23 मधून कांचन अमोल जावळे लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून त्यांना तिकीट हवंय अन त्या तिकिटावर नगरसेवक होण्याचं त्यांचं स्वप्नं आहे. यासाठी त्यांनी मतदारांना अशा प्रकारे आमिष दाखवलंय. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मुलांसाठी सायकल यांसह अनेक वस्तू 50 टक्क्यांत उपलब्ध करत, प्रलोभन दाखवलंय. महागाईच्या जमान्यात ग्राहक अर्थात मतदारांकडून याचा फायदा घेतला जातोय.(pimpri chinchwad mahanagarpalika) 

Continues below advertisement


निवडणुका जवळ आल्या की मतदार पर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते किंवा त्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात. पिंपरी चिंचवडमध्ये देखील असाच एक प्रयोग सुरू आहे, कांचनताई अमोल जावळे यांना प्रभाग क्रमांक 23 साठी भाजपकडून तिकीट हवे आहे, ते तिकीट मिळवण्यासाठीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 50 टक्के सवलतीच्या दरात काही वस्तू वाटप सुरू केल्या आहेत.(pimpri chinchwad mahanagarpalika) 


 कांचन जावळे यांचे पती अमोल जावळे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, मला हा उपक्रम चांगला वाटला, याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचता येईल जेणेकरून लोकांना महागाईच्या जमान्यात चांगल्या आणि कमी किमतीत वस्तू मिळतील, टीव्ही फ्रिज लहान मुलांच्या सायकली, पिठाची गिरण, मोठ्या सायकली, मिक्सर, गिझर, मिक्सर, ज्या रोजच्या जीवनात महत्त्वाच्या असतात त्या सर्व वस्तू इथे आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, 200 हून अधिक लोक येऊन बुकिंग करून गेले आहेत, रोज शंभर सायकली जात आहेत, स्वस्त आणि सवलतीमध्ये मिळत असल्यामुळे लोक चांगला प्रतिसाद देत आहेत. आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिला आहे तुम्ही कामाला लागा, आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला शंभर टक्के तिकीट मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.