पिंपरी: महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही आणि घराणेशाहीतील बंडखोरीही नवीन नाही. काका-पुतण्याचं नातं, भाऊ-बहिणीचं नातं हे सर्वांच्याच परिचयाचं आहे. पण पिंपरीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

पक्षाने तिकीट नाकारले म्हणून राजू दुर्गे यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पक्षाने मुलीला तिकीट दिल्याने ते आता तिच्यासाठी भाजपचा प्रचार करणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये राजू दुर्गे यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी मागितली.  पण पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करुन प्रभाग 10 मधूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निश्चय केला. पण दुसरीकडे प्रभाग क्र 14 मधून भाजपने तेजस्विनी दुर्गेला तिकीट दिले.

त्यामुळं राजू दुर्गे हे प्रभाग क्रमांक 14 मध्ये मुलीसाठी झेंडा खांद्यावर घेणार आहेत. तर दुसरीकडे प्रभाग 10 मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार केशव घोळवे याच्या विरोधात दंड थोपाटले आहेत.