पुणे : पुणे हे खऱ्या अर्थाने विद्वानांचे शहर आहे. परदेशात जिथे जिथे गेलो तिथे पुण्यातील विद्वान तरुण मला भेटले. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, यांसारख्या सर्व स्तरात पुण्याने विद्वान दिले. त्यामुळे 'पुणे तिथे काय उणे' ही उक्ती पुण्याने खरी ठरवली असल्याचं मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.


‘पुण्यभूषण फाऊंडेशन च्या वतीने दिला जाणारा 29 वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ डॉ. के. एच. संचेती यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, डॉ. रघुनाथ माशेलकर यांची उपस्थिती होती.

यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार्थी डॉ. के.एच. संचिती यांना शाल ,पगडी आणि धनादेश देऊन गौरवण्यात आलं. याबरोबर 6 जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला.