Nirmala Sitharaman to visit Baramati : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपनं कंबर कसली आहे. पक्षाचं प्राबल्य नसलेल्या अथवा भाजपचा खासदार नसलेल्या मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. देशभरातल्या तब्बल 144 लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री भेट देणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदार संघात केंद्रीय मंत्री दौरा करणार आहेत. शरद पवार यांचं प्राबल्या असलेल्या बारामतीची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  22, 23, 24 सप्टेंबर रोजी बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र भाजपच्या मिशन बारामती अंतर्गत निर्मला सीतारामन यांचा हा पहिला दौरा आहे. पुढील अठरा महिन्यांत किमान सहा वेळा असे तीन दिवसांचे दौरे अर्थमंत्री करणार आहेत. 2024 सली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदार संघात येणार आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार निर्मला सीतारामण याचा हा दौरा संघटना मजबूत करण्यासाठी असणार  आहे.  


महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45 - 
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत महाराष्ट्र भाजपनं मिशन 45 सुरू केले आहे. या मिशनची सुरुवात पवाराचे प्राबल्य असलेल्या बारामती येथून झाली आहे.  महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. त्या अंतर्गत निर्मला सीतारामन बारामतीला जाणार आहेत.  तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्र भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 


कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?
बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले


लोकसभा मिशन 45 साठीचे भाजपचे शिलेदार कोण?  
 भाजपने 12 प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे.  प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत. 


आणखी वाचा :
Aam Adami Party : भाजपकडून आपच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर, दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न, संजय सिंह यांचा खळबळजनक आरोप 


Political News : केजरीवालांनी गडकरींच्या नावे आपल्या आमदारांना केले होते फोन? योगेंद्र यादव यांनी मौन सोडले, म्हणाले..