Aam Adami Party : भाजपकडून आम आदमी पार्टीच्या (Aam Adami Party) नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंह (sanjay singh) यांनी केला आहे. संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपवर आरोप देखील त्यांनी केले आहेत. भाजपच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर दिली असल्याचे ते म्हणाले. भाजपकडून दिल्लीतील आपचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याबाबत जे घडले ते इतर आमदारांसोबत केले जात आहे. मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचे देखील संजय सिंह म्हणाले.
दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर त्यांनी केलेले प्रयत्न इतर आमदारांसोबत केले जात आहेत. तपास यंत्रणेला धमकावून भाजप दिल्लीतील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. यावेळी भाजपने ज्या आमदारांना ऑफर दिली आहे, त्या आमदारांची संजय सिंह यांनी नावे देखील सांगितली. यामध्ये आमदार अजय दत्त, सोमनाथ भारती, कुलदीप, संजीव झा यांना भाजपने ऑफर दिली आहे. भाजपचे लोक त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात 20 कोटींची ऑफर घ्या नाहीतर तुमच्यावरही सिसोदिया यांच्यासारखे गुन्हे दाखल करु असा इशारा देत असल्याचे ते म्हणाले. भाजपकडून आम आदमी पार्टीच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सिंह यावेळी म्हणाले.
आम्ही केजरीवाल यांचे सैनिक आहोत, विकले जाणार नाही.
दरम्यान, संजय सिंह यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ही दिल्ली आहे, आम्ही केजरीवाल यांचे सैनिक आहोत. आम्ही विकले जाणार नाही. आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला पण आमच्या आमदाराने त्यांचे कारस्थान उघड केल्याचे संजय सिंह यावेळी म्हणाले. त्याचवेळी आपचे नेते सोमनाथ भारती यांनीही भाजपचे लोक माझ्याकडे आल्याचे सांगितले. आमच्याकडे या नाहीतर मनिष सिसोदिया यांच्यासारखी तुमची देखील अवस्था करु असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे सोमनाथ भारती यांनी सांगितले.
मनिष सिसोदिया यांच्यावर गुन्हा दाखल
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने ईडीकडे (ED) महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्यानंतर ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली होती. त्यामुळे सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले होते. यामध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: