मुंबई / पुणे : पुण्याचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी जाऊन लांडगेंनी पक्षप्रवेश केला.
लांडगेंच्या भाजपप्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. महेश लांडगे हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले आहेत. आमदार होण्याआधी लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणूनही लांडगे यांनी काम केलं होतं. लांडगे यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे.