मॉडेल अर्शी खान पुण्यातील सुधारगृहातून पळाली
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 25 Oct 2016 03:46 PM (IST)
पुणे : मॉडेल अर्शी खान पुण्यातील हडपसरच्या महिला सुधारगृहातून पळून गेली आहे. अर्शीने दलालांच्या मदतीने पलायन केल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी सोशल सर्विस सेलने एका हॉटेलमधून अर्शी खानला अटक केली होती. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिची रवानगी हडपसरच्या महिला सुधारगृहात करण्यात आली होती. आज मात्र एका दलालाच्या मदतीने तिने त्या सुधारगृहातून पळ काढला. या सुधारगृहातून गेल्या काही दिवसात अशा पद्धतीने अनेक महिला पळून गेल्या आहेत. कोण आहे अर्शी खान? अर्शी खान ही भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती हैदराबादमध्ये एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. अर्शी खान आणि शाहिद आफ्रिदीचं अफेअर? दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत अर्शी खानचं अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. दुबईतील एका हॉटेलमध्ये दोघांना एकत्र पाहिल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं होतं. संबंधित बातम्या