Chandrakant Patil vs Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. पण चंद्रकांत पाटील यांना घाई आहे. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या जागी जाऊन बसायचे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला, ते पुण्यात बोलत होते. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याशिवाय शुक्रवारी पुण्यात झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचाही समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुण्याचे पाणी कमी केले तर पुणेकर पाणी पाजतील. पण देवेंद्र फडणवीस यांना पुणेकरच उत्तर देतील. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी पुणेकरांमधे भिती पसरवण्याचे काम केले आहे.  मुख्यमंत्र्यी राहिलेल्या व्यक्तीनं असं वक्तव्य केलं असेल तर आश्चर्य आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. 


पुण्यात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर चौफेर टीका केली. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तरही दिलं. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र सरकारचा पुणे शहराचा पाणी कपात करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून पाणी कपात करण्यासाठी अशीच अकरा पत्रे देण्यात आली होती.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मधे पाणीकपात करण्यात आली होती. आमच्या काळात एका अधिकाऱ्याने  खडकवासला धरणातून पाणी कपात करणायासाठी फक्त एक पत्र दिलेय.  पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि होणार नाही. भाजपच्या काळात मात्र पुण्याच्या खडकवासला धरणाचे पाणी कपात करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुण्याचे पाणी कमी केले तर पुणेकर पाणी पाजतील. पण देवेंद्र फडणवीस यांना पुणेकर उत्तर देतील. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी पुणेकरांमधे भिती पसरवण्याचे काम केले आहे.  मुख्यमंत्र्यी राहिलेली व्यक्तीने असे वक्तव्य केले असेल तर आश्चर्य आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता वाढवण्याचे काम भाजपने केले.पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांसाठी अतिरिक्त पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. लोकसंख्येचे नवे आकडे आले की पुण्याला पाणी वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.’ प्रत्येक शहराला पाणी देताना कसरत होतेय.  मुंबईच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होतोय. पाण्याचा वापर कार्यक्षमतेने करायला हवा, असेही जयंत पाटील म्हणाले. 


जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -



  • हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होईल.  विधानसभा अधिवेशनाचा काळ वाढवण्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.

  • राष्ट्रवादीची भुमिका स्पष्ट भुमिका आहे की भाजपच्या विरोधात जे आहेत त्यांनी एकत्र यायला हवे. कोणाला वगळण्याचे कारण नाही.

  • नाशिक कुसुमाग्रजांची नगरी म्हणून ओळखली जाते. कुसुमाग्रज हे मराठीतील सर्वात मोठे साहित्यिक आहेत. कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध करणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान करण्यासारखे होईल.  माझी फडणवीसांना सूचना आहे की  त्यांनी शिवसेना त्यांच्यापासून दुर गेली म्हणून सावरकारांचा मुद्दा इथे साहित्य संमेलनात काढू नये.

  • पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आणि राज्यातील इतर निवडणुकांमधे कॉंग्रेस,  शिवसेना आणि इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.  स्थानिक पातळीवर याबाबत निर्णय होईल.

  • सातारा जिल्ह्यातील जिहे काठापुर पाणी योजनेची एक लाईन पुर्ण झालीय.  दुसरीही लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.